अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिरावर ४१ फुटाची त्रिशूल स्तंभारोपण दि.1 रोजी करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात या त्रिशूलाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणूक प्रसंगी महिला व ग्रामस्थांनी या त्रिशूलाची घरोघरी आरती करण्यात आली. ही ४१ फूट त्रिशूल अजंगवडेन ता. मालेगावं येथील रविंद्र बाळकृष्ण जगताप या कारागीराने बनवली आहे. यावेळी मंदिरावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महादेव मंदिरावर ही ४१ फूट त्रिशूल सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बसवण्यात आली आहे.
तालुक्यात पुरातन काळातील कपिलेश्वर येथील महादेव मंदिर व अमळनेर -बेटावद रस्त्यावरील झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.