अमळनेर: बसस्थानकाजवळ टॅक्सी, अवैध प्रवासी वाहने, रिक्षा आणि फळविक्रेत्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. बसस्थानकाजवळील सी सी टीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
बसस्थानक परिसरात मंत्री अनिल पाटील यांनी टॅक्सी चालकासाठी स्वतंत्र शेड उभारले आहे. मात्र तरीही रस्त्यावर टॅक्सी उभ्या करून टॅक्सीचालक रस्त्यात अतिक्रमण करून अडथळा निर्माण करतात. त्यांच्या बाजूला बेकायदेशीर पणे काही रिक्षाचालक तेथे गर्दी करतात. त्यामुळे बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस आणि प्रवाशी याना खूप त्रास होतो. त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते आपली खाजगी जागा समजून रस्त्यावर कोठेही उभे राहतात. पायी चालणार्याना सर्कस करत रस्ता ओलांडावा लागतो. भागवत रस्त्यावर पालिकेने लोखंडी खांब लावून जणू काही अतिक्रमण धारक दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांची सोय केली आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याने वाहनचालक मुजोर झाले आहेत.
बसस्थानकाजवळ सिसीटीव्ही कॅमेरे लावून देखील त्यांचा कधीच उपयोग झालेला नाही. पोलीस अधिकारी अथवा व्हीआयपी व्यक्तीची वाहने गेल्यानन्तर वाहनचालक कसे रस्त्याबर उभे रहातात हे कॅमेऱ्यात दिसून येईल व त्यांच्यावर कारवाई करता येईल. त्यामुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यात यावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
Related Stories
December 22, 2024