
अमळनेर:- तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिओच्या तीन टॉवरवरून एकूण १२ बॅटरी चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.
याबाबत जिओ कंपनीचे टेक्निशियन प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जैतपिर येथील २८ हजार रुपये किमतीच्या ४ बॅटरी, गलवाडे शिवारातील ३५ हजाराच्या ५ बॅटरी, कळंबु शिवारातील २१ हजार किमतीच्या ३ बॅटरी अश्या अश्या एकूण ८४ हजार किमतीच्या १२ बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहेत. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.