प्रतापमध्ये राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे उदघाटन…
अमळनेर: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 व 6 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपले शिक्षण स्कील ओरिएंटेड असायला हवे. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात जर्मन व जापनीज या भाषाही शिकवल्या जातील असे नमूद केले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले पीएसआय धनंजय कोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रामाणिक काम केल्याने यश मिळू शकेल, मेहनतीवर विश्वास ठेवा, शिक्षणात सातत्य व धैर्य टिकवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेत यायचे असेल तर जिद्दीने आले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्तविक करियर कौन्सिलिंग सेंटर विभागाचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.वृषाली वाकडे यांनी करून दिला.
या वेळी मंचावर खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक मा. डॉ.अनिल शिंदे,श्री.योगेशभाऊ मुंदडे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.जितेंद्र देशमुख, सौ.वसुंधरा लांडगे, सौ.माधुरी पाटील, प्रा.वृषाली वाकडे,संस्थेचे सह सचिव तथा अधिसभा सदस्य डॉ.धिरज वैष्णव उपस्थित होते.प्रस्तुत स्पर्धेकरिता डॉ.अनिल शिंदे व योगेश मुंदडे यांनी शुभेच्छा दिले, त्यांनी जिंकणे व हारने हे एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे तसेच गुणवत्तेस जगात प्राधान्य असल्याचे मत व्यक्त केले.या प्रसंगी उप प्राचार्य डॉ.अमित पाटील,डॉ.विजय मांटे, डॉ.कल्पना पाटील तसेच डॉ.धनंजय चौधरी, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे,डॉ.आर सी सरवदे, डॉ.अशोक पाटील,डॉ. रवी बाळसकर,डॉ.माधव भुसनर,प्रा.विवेक बडगुजर,प्रा.रामदास सुरळकर,प्रा.वैशाली राठोड,प्रा.वैशाली महाजन,डॉ.वंदना पाटील,प्रा.देवेंद्र तायडे, डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.रवींद्र मराठे,डॉ.किरण गावीत, ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.एस डी बागूल,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा.योगेश पाटील,डॉ.अनिल झळके, प्रा.नितेश कोचे, प्रा.रोहन गायकवाड, प्रा.विजय साळुंखे, डॉ.विलास गावित,प्रा.पुष्पा पाटील, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा.अवित पाटील,प्रा.जयेश साळवे,डॉ.बालाजी कांबळे, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.प्रदीप पवार,प्रा.दिलीप तडवी,डॉ.राखी घरटे,डॉ.हर्ष नेतकर आदी उपस्थित होते. तर प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नलिनी पाटील यांनी केले तर आभार डॉ.जितेंद्र पाटील यांनी मानले.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी सचिन आवटे,प्रा.चंद्रशेखर वाडे,दिलीप शिरसाठ, पराग पाटील,मेहूल ठाकरे,दिपक चौधरी,हिमांशू गोसावी,अतुल धनगर,अहिरे अनिकेत सह सीसीएमसी व इलेट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.