अमळनेरः ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड संचलित न्यु इंग्लिश स्कूल, प्र. डांगरी ( अमळनेर ) येथे आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता १० वी चे विद्यार्थी शैलेश उत्तम बेलदार या विद्यार्थ्यांने मुख्याध्यापक म्हणून काम सांभाळले. तसेच शाळेतील इयत्ता १० वीचे विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कामाचा अनुभव घेतला. यानंतर विद्यालयात शिक्षकांचा सन्मानार्थ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक राकेश पवार , तर जेष्ठ शिक्षक पी व्ही. साळुंखे, निलेश शर्मा, सुरेश वाडीले, महेंद्र पाटील व प्रतिभा सोनवणे व राजन शिंदे व विद्यार्थी मुख्याध्यापक शैलेश बेलदार हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक दिव्या बेलदार यांनी तर कार्यक्रमाचे आभार अमृता भोई यांनी केले.