अमळनेर:- तालुक्यात शहरात 120 तर ग्रामीण भागात 41 मंडळे गणपती स्थापना करणार आहेत.
गणेशोत्सव काळात शहरात व तालुक्यात शांतता रहावी म्हणून पोलीस निरीक्षक-१,उप पोलीस निरीक्षक-३, पोलीस कर्मचारी-५०,एसआरपीएक १ तुकडी,आर सी पी एक तुकडी,ट्रॅकिंग फोर्स १ तुकडी व होमगार्ड- ५५ असा पोलीस ताबा तैनात करण्यात आला आहे. वाघोदा, बिलखेडा, एकरूखी, खडके, पिळोदा, मांजर्डी, कोंढावळ या गावात एक गाव एक गणपतीची स्थापना होणार आहे. गणेशोत्सव काळात शांतता भंग होऊ नये यासाठी 112 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना नोटिसा पाठण्यात आल्या आहेत.