अमळनेर:- विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान सर्वात महत्त्वाचे असते. शिक्षकच विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यात मदत करतो. जीवनात अंधारातून प्रकाशाची मशाल दाखवण्याचे काम फक्त शिक्षकच करतात ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील शिरूड येथील व्हि झेड पाटील हायस्कूल शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आली.
श्रीमती नलिनी प्रभाकर कुलकर्णी उर्फ बालवाडी ताई यांच्या स्मृती प्रत्यार्थ शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आले. हा उपक्रम अवरीत रित्या २४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त केले. महान शैक्षणिक तत्ववेत्ता, आणि एक प्रख्यात मुत्सद्दी, विद्वान, भारताचे राष्ट्रपती आणि सर्व शिक्षक. या महान शिक्षकाला श्रद्धांजली म्हणून त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून पाळला पाळतात. ५ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका घेतली विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेतला सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच जि प शाळा व हायस्कूल येथील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या दिवशी विद्यार्थ्यांना गोडधोळ स्वरूपाचा फराळ वाटप करण्यात आला. शिरूड हायस्कूल या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच श्री मंगळ ग्रह संस्थेचे पदाधिकारी, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामसेवक, उपसरपंच, सदस्य, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, पत्रकार बांधव शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.