
अमळनेर:- येथील श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी अंमळनेर संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर एकरुखी येथे आयोजित केले आहे.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भांडारकर, सरपंच मनिषा भिल, प्राचार्य डॉ पी एस पाटील, दिलीप पाटील, सुनील पाटील, मनोज पाटील, उपसरपंच श्री सुरेश पाटील, शिबिर समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी), प्रा विजयकुमार वाघमारे (सहायक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) कार्यालयीन अधिक्षक श्री अनिल वाणी, महाविद्यालयाचे लिपिक योगेश संदांशिव मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एन एस एस गीत सुप्रिया बोरसे या स्वयंसेवक विद्यार्थीनीने तर स्वागत गीत प्राजक्ता टीगळे व प्रियांका देसाई या विद्यार्थीनीने सादर केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया यांनी केले. शिबिराचे उद्घाटन एकरुखी गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मनिषाताई भिल यांनी महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थांना उद्देशून सांगितले की, २ ऑक्टोंबर १९७४ हे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे १०० वे जयंती वर्ष असल्याने २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्थापना झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला जास्तीत जास्त प्रेरणा देण्यासाठी शिबिरातील सर्वच उपक्रमांमध्ये उत्साही पद्धतीने सहभाग नोंदवावा ही अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष सुभाष भांडारकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक तथा ग्रामीण शिबिरातील विद्यार्थ्यांनां शिबिराचे महत्व पटवून दिले. प्रा. डॉ.भरत खंडागळे, प्रा. डॉ.सागरराज चव्हाण, प्रा विजयकुमार वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन गावाच्या विकासासाठी श्रम संस्कारासाठी कसे काम करावे याविषयी मार्गदर्शन केले. एनएसएस शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मा.मनिषा ताई भिल, तसेच उपसरपंच तात्यासो सुरेश विक्रम पाटील, एकरुखी गावातील माजी सरपंच आबासाहेब हिरामण पाटील, माजी सरपंच सुभाष आत्माराम पाटील, जितेंद्र काशिनाथ पाटील माजी सरपंच दीपक पुंडलिक पाटील, माजी सरपंच नंदलाल विनायक पाटील माजी सरपंच, विठ्ठल रुपला पाटील, रविंद्र देवराम पाटील पोलीस पाटील, योगेश पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन एकरूखी नरेंद्र भास्कर पाटील, शाळा चेअरमन रवींद्र नथू पाटील, मा. चेअरमन अशोक पाटील, सोनल पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, ताराबाई भिल अंबिर रामदास, योगेश पांडुरंग पाटील, यासह मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांनी पाटील, रुपाली पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शितल बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया, प्रा विजयकुमार वाघमारे (सहायक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) प्रा.डॉ.अनिता एम. खेडकर प्रा. चंद्रशेखर बोरसे, प्रा. डॉ.भरत खंडागळे, प्रा. डॉ.श्वेता वैद्य, प्रा.डी.आर.ढगे, प्रा डॉ जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. सागरराज चव्हाण कार्यालयीन अधिक्षक अनिल वाणी, सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी सहकार्य केले.







