
राज्यपालांसोबत बैठकीत भाकपची मागणी…
अमळनेर:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासोबत १० रोजी अजिंठा विश्राम गृह जळगाव येथे आले असता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतीमालाला हमीभाव श्री. स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार मिळावा, शेती शिवार रस्ते,भ्रष्टाचार, गायरान धारक शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर कराव्यात, शेतकऱ्यांना वय वर्षे ५५ नंतर महागाई नुसार पेंशन, बालिका व महिला अत्याचार, दलित व आदिवासींवरील अत्याचार, जातीय जन गणना करावी ,५० % आरक्षण मर्यादा वाढवावी, बेरोजगारी, केंद्र आणि राज्यसरकार यांच्यातील पदांवर भरती व्हावी,रोजगार हमी योजनेंतर्गत श्रमिकांना काम मिळावीत शाळा, महाविद्यालयांतील रिक्तपद भरावीत ,चांगल्या आरोग्य सुविधा सर्व सामान्य नागरिकांना मिळाव्यात , शेतकर्यांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी , आशा ,आरोग्य, मध्यान्न भोजन कर्मचारी यांना न्याय द्या , इ.विविध विषयांवर चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिष्टमंडळात काॅ. ज्ञानेश्वर पाटील जिल्हा सेक्रेटरी,काॅ. विठ्ठल बडगुजर, काॅ .प्रल्हाद एरंडे, काॅ.निर्मला भिल, काॅ.प्रभुदास कसबे,काॅ. पूनम अहिरे, काॅ. भुरा भिल हजर होते.

