
अमळनेर:- शहरातील एका मशिदीवर गुलाल फेकल्याप्रकरणी एका मंडळाच्या अध्यक्ष व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसाली मोहल्ल्यातील इकबालखान अकबरखान कसाली मोहल्ल्यातील जामा मशिदीचे ट्रस्टी यांनी फिर्याद दिली की, १७ रोजी गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना माळीवाड्यातील त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष रोहित हेमराज महाजन (रा माळीवाडा) व इतर सदस्य यांनी जामा मशिदीवर गुलाल फेकून भावना दुखावल्या. तसेच दगडी दरवाज्याबाहेर पिपरीवाडा दर्ग्यावर देखील गुलाल फेकला याबाबत ट्रस्टीची बैठक होऊन त्यांच्यासोबत चर्चा करून अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

