दुःख विसरून साचलेले पाणी बादल्यानी फेकण्याची नातेवाइकांवर वेळ
अमळनेर :- ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी गावातील रस्त्यांचे नियोजन न झाल्याने घरांजवळ पाणी साचून वृद्धाच्या अंत्ययात्रेसाठी अडथळे निर्माण झाल्याने नातेवाईकाना दुःख विसरून साचलेले पाणी बादल्यानी फेकण्याची वेळ आली.
प्रेमराज गणपत पाटील वय ९६ रा आनोरे यांचे निधन झाले. अन रात्रीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने घराजवळ गल्लीत मोठे डबके साचले. मुख्य जवखेडा रस्ता हा गावाच्या रस्त्यापेक्षा उंच झाल्याने गावातील पाणी निघाले नाही. ग्रामपंचायतीने याबाबत काहीच दखल न घेतल्याने प्रेमराज पाटील यांच्या नातेवाईकांना बराच वेळ साचलेले पाणी बादल्यानी भरून बाहेर फेकावे लागले.
प्रतिक्रिया…
ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास आला असून यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने कार्यकारिणीने प्रशासकाला देखील पदभार दिलेला नाही. त्यामुळे काहीच काम करता येत नाही. कर्मचाऱ्यांचे १७ महिन्यांपासून पगार बंद आहेत. अचानक पाऊस झाल्याने डबके साचले. तरी देखील याबाबत दखल घेतली जाईल- शशिकांत पाटील, ग्रामसेवक