अमळनेर:-येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी राजपूत, कळमसरे यांची फेरनिवड करण्यात आली.
सदर नियुक्तीबद्दल भाजपच्या तालुका बैठकीत खासदार स्मिताताई वाघ,भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, प्रभारी मधुभाऊ काटे, तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, श्याम अहिरे, विधानसभा संयोजक श्रीनिवास मोरे, माजी जि.प. सदस्या मीना रमेश पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,सरचिटणीस महेंद्र पाटील, कैलास पाटील, राकेश पाटील आदींनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
दरम्यान शिवाजी राजपूत हे गेल्या अनेक वर्षापासून भाजप पक्ष संघटनेत सक्रिय असून पक्ष संघटन वाढविण्यासाठी त्यांचे अमूल्य असे योगदान आहे.गेल्या काही वर्षापासून युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत असताना उत्तम काम त्यांनी केल्याने कामाची पावती म्हणून त्यांची तालुकाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे.
कळमसरे ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सदस्य असून सामाजिक,राजकीय आणि सोबतच आरोग्य क्षेत्रात आरोग्य दुत म्हणून विशेष असे त्यांचे कार्य आहे.सदर फेर नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.