मराठा समाजाला मिळाली तब्बल ३२ लाख ८२ हजार रुपयांची देणगी…
खा. स्मिता वाघ यांचा नागरी सत्कार व आ मंगेश चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार…
अमळनेर:- येथील कै.सुंदरबाई दिनकरराव देशमुख मंगल कार्यालयात तालुका मराठा समाजातर्फे खा.स्मिता वाघ यांचा नागरी सत्कार, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला तर समाजाच्या विविध क्षेत्रातील गुणवन्तांचा देखील सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील होते.
यावेळी जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील तसेच असिस्टंट कमांडन्ट यशपाल पवार रा.मठगव्हाण, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डीवायएसपी वासुदेव देसले यांचादेखील गुणगौरव करण्यात आला.
समाज हाच पाया- ना.अनिल पाटील
समाज हाच माझा पाया आहे. म्हणून समाजाचा मला अभिमान आहे. तुमच्यामुळे मी आमदार झालो असे ना.अनिल दादांनी मान्यच केले. त्याची उतराई करण्यासाठी मी देखील तेव्हढाच कटिबद्ध राहतो, असे सांगत ना.अनिल दादांनी या संस्थेला २१ लाखाची देणगी जाहीर केली. ती लागलीच घेवून जा असे नम्रपणे त्यांनी सांगितले.
मदतीचा हात पुढे ठेवा-आ.मंगेश चव्हाण…
तुमच्या कृपेने माझ्याकडे अलिकडे पैसा येवू लागला. मदत देण्याकरिता माझा हात सदैव पुढे असतो असे म्हणत चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांनी अमळनेरच्या मराठा समाज संस्थेला ११ लाखाची देणगी घोषित केली. लागलीच ते घेवून जा अशी पुष्टी पण त्यांनी जोडली. पैकी ५ लाख रुपयांत समाजातील हुशार, गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि उर्वरित ६ लाख या संस्थेच्या विकास कामाला लावावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समाज सोपवेल ती जबाबदारी पार पाडेल- खा स्मिता वाघ…
मला समाजाने खूप प्रेम दिले. तुम्ही मला फक्त सांगा, मी ती जबाबदारी शिरसावंद्य मानत पार पाडेल.तुम्ही मला अनेक पदांवर निवडून दिले.अशा शब्दांत नागरी सत्काराला खा.स्मिता वाघांनी समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यशामागे संघर्षही- यशपाल पवार
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेलो, माझ्या यशामागे संघर्षाची गाथा आहे. खूप अडथळे आले. पण मी संघर्ष करीतच राहिलो आणि सीआरपीएफ मध्ये असिस्टंट कमांडन्ट झालो.अजूनही मी परीक्षा देतच आहे. मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. एकदा ठरविले तर मागे हटू नका. यश हमखास मिळते. असे मनोगत यशपाल पवार याने व्यक्त केले.
व्यापक दृष्टी ठेवावी- डीवायएसपी देसले
समाजाच्या भल्याचा विचार तर आपण केलाच पाहिजे.व्यापक दृष्टीने संपूर्ण मानव जातीच्या भल्याचा विचार सुद्धा ठेवला पाहिजे. एमपी एससी परीक्षा उत्तीर्ण झालेले दहिवदचे वासुदेव देसले( डीवायएसपी, नाशिक ग्रामीण )यांनी सांगितले की, आपल्या कार्याचा ठसा उमटवित आपली उपयुक्तता जनकल्याणाकामी आली पाहिजे. आयुष्यभर आपण शिकत राहिले पाहिजे, त्याच्याने ज्ञानात भर पडते.
कमी बोला, जास्त ऐका- न्या.गुलाबराव पाटील…
मी सुद्धा मिल मध्ये होतो. ध्येय निश्चित केले की, त्याच दिशेने चालतच राहावे.न्यायाधीश झालो आणि सेवानिवृत्त झालो . कमी बोलणे आणि जास्त ऐकत राहणे हे माझ्या यशाचे गमक आहे. असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला. सूत्र संचलन उपाध्यक्ष संजय पाटील व कैलास पाटील यांनी तर प्रास्ताविक संचालक संजय पाटील यांनी केले तर तालुका मराठा समाजाध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर डॉ.बी एस पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, प्रभाकरराव देशमुख व डॉ.अनिल शिंदे , उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, सचिव विक्रांत पाटील ,सहसचिव प्रवीण पाटील ,संचालक एस एम पाटील ,मनोहर पाटील , संजीव पाटील ,चंद्रकांत काटे, स्वप्नील पाटील ,डॉ सुमित पाटील , जे पी पाटील ,गौरव पाटील ,भूषण भदाणे देखील उपस्थित होते.
या समारंभाच्या यशस्वीतेसाठी विलास पाटील ,गोकुळ पाटील यांच्यासह मराठा समाज कार्यकर्त्यांनी सहकार्य केले
कृउबा संचालिका सुषमाताई देसले यांनी ५१ हजार व निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यांनी ३१ हजाराची देणगी जाहीर केली आहे. समाजाला एकूण ३२ लाख८२ हजार रुपये देणगी मिळाली.