
प्रताप महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप…
अमळनेर:- तालुक्यातील रढावण- राजोरे गावात 10 मार्च ते 16 मार्च दरम्यान प्रताप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिर पार पडले असून १६ रोजी शिबिराचा समारोप झाला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर शिरोडे तर प्रमुख अतिथी IQUAC समनव्यक प्रा डॉ जे आर गुजराथी, ढोमन पाटील, गंगाराम पाटील यांची उपस्थिती होती. महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजनानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. अवित पाटील यांनी 7 दिवसांमध्ये सिसिटी, सर्वेक्षण, ग्रामस्वच्छता इतर केलेल्या कामांविषयीचेअहवाल वाचन केले जयेश सोनार, शेजल पाटील यांनी मनोगतातून सात दिवसात झालेला सकारात्मक बदल प्रकट केला. अतिथी मनोगतातून ढोमन पाटील यांनी स्वयंसेवकांनी गावात केलेल्या कामाची स्तुती करून महाविद्यालयाचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शिरोडे यांनी जलसंवर्धनासाठी 98 सिसीटी केल्याबद्दल स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. जलसंवर्धनातून गावाला समृद्धीकडे नेता येईल असे प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भाग्यश्री जाधव तर आभार प्रदर्शन प्रा योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ नेरकर,प्रा डॉ योगेश तोरवणे, भैया पाटील, नितीन पाटील, दीपक पाटील, उपस्थित होते सिनियर स्वयंसेवक गुरुदास कोळी, सचिन पाटील, सुमित पाटील, आकाश धनगर, निखिल पाटील, शुभम पाटील, निखिल पाटील, श्रीकेश पाटील यांनी मेहनत घेतली.







