
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) च्या पदार्थ विज्ञान विभागामार्फत दिनांक ३० सप्टेबर व १ ऑक्टोबर अशी दोन दिवस शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. सदर सहलीसाठी एकूण 32 विदयार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. हया अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत प्रा. डॉ. अमित पाटील , प्रा. डॉ. एस. डी. बागुल, प्रा. डॉ.प्रियंका पाटील, प्रा संदीप नेरकर व प्रा आकाश चौधरी होते. ह्या शैक्षणिक सहलीत IUCAA केंद्र व पदार्थ विज्ञान विभाग, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ ह्या दोन केंद्रान्ना भेटी देण्यात आल्या.
Inter University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA) ह्या केंद्रात प्रथम भेट देण्यात आली. IUCAA ही पुणे विद्यापिठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेमध्ये खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि सिद्धांतिक भौतिकी या विषयावर संशोधन केले जाते. सदर संस्थेचे प्रेरणास्थान डॉ जयंत नारळीकर हे प्रथम संचालक होते. विदयार्थ्यांना संपूर्ण केंद्राची विस्तृत माहीती प्रसाद आडेकर व तुषार पुरोहीत ह्यांनी दिली. त्यानंतर पुणे विद्यापिठाच्या भौतिक शास्त्र विभागास भेट देण्यात आली. पदार्थ विज्ञान विभागातील Nuclear accelerator , Nuclent reactor, XRD machine,FTIR ह्या सारख्या संशोधनासाठी उपयुक्त अशा उपकरणांची माहीती देण्यात आली. वरील दोन्ही केंद्रात भेट व इतर आवश्यक व्यवस्थेसाठी प्रा. डॉ संजय ढोले ह्यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधन बाबत जिज्ञासा निर्माण करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा हा शैक्षणिक सहलीचा उदात्त हेतु काही प्रमाणात साध्य झाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. सदर सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, IQAC चे Co-ordinator व विभाग प्रमुख ह्यांचे मार्गदर्शन लाभले.

