
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा येथील साठ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयांनी मारवड पोलिसांत दिली आहे.
बोहरा येथील परशुराम पोपट कोळी (वय ६०) हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता घरून निघून गावातील चौकात बसले होते. दुपारी दोन वाजता त्यांचा मुलगा त्यांना जेवायला बोलवायला गेला असता ते तिथे आढळून आले नाहीत. आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता कोणताही तपास न लागल्याने त्यांच्या पत्नीने मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.

