मंगळग्रह सेवा संस्था ,नारीशक्ती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर:- शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि नारीशक्ती ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ६ रोजी पहाटे पाच वाजता निघालेल्या श्री क्षेत्र सतीमाता पायीदिंडीत सुमारे पाचशे पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवत उदंड प्रतिसाद दिला.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने आयोजित या दिंडीची सुरूवात तिरंगा चौकात महाआरती होऊन वाजतगाजत, भक्तिमय वातावरणात झाली. दिंडीत सहभागी महिलांनी लाल, पिवळ्या साड्या परिधान केल्या होत्या. दिंडी सतीमातेच्या मंदिरावर पोहचल्यानंतर स्पार्क फाउंडेशनचे संचालक पंकज दुसाने यांनी सपत्नीक आरती केली. त्यानंतर हभप समाज प्रभोधनकार राधाताई पाटील भोलानेकर यांचे प्रवचन झाले. यावेळी माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, हिरा उद्योग समुहाच्या रेखा चौधरी, हिंगोणेच्या सरपंच राजश्री पाटील, नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा निशा दुसाने, उपाध्यक्षा माधुरी पाटील, आशा महाले, जयश्री साबे, सदस्या नेहा देशपांडे, योगिता पांडे, विद्या शहा, निता कांबळे, रत्ना चौधरी, उज्वला मालपुरे, रेखा बागुल, सरला चौधरी, सरला शिंपी, रत्ना भदाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
दरम्यान मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थित महिलांसाठी चहा ,पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती . आयोजकांनी परतीच्या प्रवासासाठी चारचाकी वाहनांची सोय केली होती.
यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, पंकज दुसाने, डॉ. मिलिंद पाटील आदींनी परिश्रम घेतले.