अमळनेर येथे कुमावत बेलदार समाजसेवा संघाचा मेळावा संपन्न
अमळनेर : कुमावत बेलदार समाजाने किल्ले, दुर्ग , वास्तुशिल्प बांधून इतिहास ,शौर्य आणि संस्कृती जतन करण्याचे काम केले आहे. हा समाज जरी विखुरलेला असला तरी या समाजाने बांधून ठेवण्याचे मोठे योगदान दिले आहे. असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथे आयोजित कुमावत बेलदार समाजसेवा संघाच्या पहिल्याच मेळाव्यात बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी होते. कुमावत बेलदार समाजातर्फे नूतन कार्यकारिणी पद्ग्रहण सोहळा तसेच समाजाचे निवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शहरात समाजाचे दैवत संत शिरोमणी गरवाजी भाटी यांचे स्मारक व सामाजिक सभागृह उभारण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ कुबेर कुमावत यांनी केले. त्यांनी समाजाचा इतिहास व पार्श्वभूमी सांगितली. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष प्रदीप कामे , उपाध्यक्ष बापूसाहेब कुमावत , प्रदेश सचिव भगवान कुमावत , वसंतराव मुंडावरे , ईश्वर बेलदार हजर होते. यावेळी नवनियुक्त तालुका कार्यकारिणी , युवा कार्यकारिणी , आणि महिला कार्यकारिणी याना नियुक्तीपत्र देण्यात आले. निवृत्तांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी तर आभार तालुकाध्यक्ष योगेश कुमावत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा डॉ कुबेर कुमावत , योगेश कुमावत ,रवींद्र उदेवाल, दीपक कुमावत , नरेंद्र कुमावत , रवींद्र कुमावत , अशोक कुमावत , कैलास कुमावत , सुधाकर कुमावत , सुरेश कुमावत , अविनाश कुमावत , विजय कुमावत , भास्करराव कुमावत , दिपक कुमावत , परेश कुमावत ,श्रीकृष्ण नागे , गिरीश कुमावत यांनी सहकार्य केले.