
हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष…
अमळनेर:- शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था हसनैन करीमैन वेल्फेअर सस्थांच्या माध्यमातून दर वर्षी इस्लामी महिना ग्यारवी शरीफचे औचित्य साधून ऑल मुस्लिम समाजाचे सामुहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदा दिनांक ५ ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशातील मौलाना मुफ्ती इमरान नक्शबंदी यांच्या मुख्य उपस्थितीत ११ जोडप्यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मौलाना कारी मोतेशीम यांनी कुराणातील तिलावत वाचन केली तर शहरातील विविध मस्जिदेतील मौलाना यांनी निकाह लावला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जळगांव येथील इकरा संस्थाचे सचिव एजाज मलिक,मनियार समाजाचे अध्यक्ष फारुख शेख, दोंडाईचा नगरपालिकाचे उपाध्यक्ष नबु सेठ पिंजारी, कुरैशी जमातचे जळगांव जिल्हाध्यक्ष जाकिर कुरैशी, भडगांव अँग्लो ऊर्दू शाळेचे चेअरमन हाजी मुनसफ खान, मोहसीन मुनाफ खाटीक, जळगांवचे माजी उपमहापौर करीम सालार यासह मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला तसेच सामाजिक कार्यकर्ते रफीक मिस्तरी आणि सैय्यद मुशर्रफ अली यांच्या वतीने सर्व संचालक मंडळाचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थाचे अध्यक्ष हाजी शब्बीरअली सैय्यद, उपाध्यक्ष मोईनुद्दीन शेख उपाध्यक्ष जाकिर शेख शकुर, सचिव सैय्यद अजहर अली, खाजिनदार आरिफ मेमन, सहसचिव अशफाक शेख, सदस्य सैय्यद नबी, जुबेर खान पठाण,मुत्तलीब खाटीक, इमरान शेख, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात सुत्र संचालन कवी साबिर मुस्तफा आबादी यांनी तर आभार प्रदर्शन रिजवान मनियार,नविद शेख यांनी केले.