अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम
अमळनेर : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मात्र फक्त १०० टक्के अनुदान २००५ नंतर मिळाले म्हणून शासनाने वंचित ठेवलेल्या राज्यातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना आगामी मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घ्यावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम सत्ताधारी पक्षाच्या मतदानावर होऊ शकतो असा इशारा पीडित शालेय कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दिला आहे.
एकीकडे शासन न मागणाऱ्याना भरपूर देत आहे ,नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात निघून मात्र प्रत्यक्षात त्यांनतर नियुक्त कर्मचार्यांना देखील जुनी पेन्शन योजना शासनाने मंजूर केली आहे. तर मग नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त होऊन कामे करून सुद्धा फक्त शासनानेच अनुदान दिले नाही म्हणून शालेय कर्मचार्यांना शासन सावत्र वागणूक का देत आहे? शासनाने नियुक्त केलेल्या ९ आमदार व दोन शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा ११ लोकांच्या समितीने देखील अहवाल सादर केला आहे. आचार संहिता लागण्यास अवघा आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही सभागृहात याबाबत आश्वासन दिले आहे. शिक्षक आमदार तथा पदवीधर आमदार निवडणुकीत देखील आश्वासन दिले आहे. तरीही आश्वासनाची पूर्तता होत नाही. त्यामुळे त्या पीडित २६ हजार कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय ,त्यांचे नातेवाईक यांच्यात शासनाबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याची दखल घेण्यात यावी अन्यथा मतदानावर परिणाम होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. मंत्री अनिल पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर जुनी पेन्शन योजना संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास पाटील , प्रकाश पाटील ,ईश्वर महाजन ,माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील , दिनेश पाटील , सुरेश महाजन , सतीश बिऱ्हाडे , दिलीप पाटील , काझी असलमोद्दीन , आरिफ शेख इस्लाम , महंमद रफीक शेख बशीर , कल्पना पाटील , दीपक वाघ , विलास पाटील , दगडू सोनवणे , युवराज पाटील , मेघराज पाटील , कैलास पाटील , दीपक पवार , मिलिंद पाटील , रातिभान निकम , भरत पाटील , विजय पाटील , किशोर पाटील , शशिकांत पवार , अनिल पाटील , शांतीलाल पाटील , मयूर पाटील ,नंदा पाटील , राजेंद्र पाटील , शिवाजी पाटील , चंद्रकांत पवार , बंडू पाटील , महेश पाटील , जगदीश पाटील ,अनिल पाटील , रंगराव पाटील , जितेंद्र पवार , सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण , प्रवीण पाटील , हर्षल पाटील , शरद पाटील , हनुमंत पाटील , संदीप गोसावी , दिलीप पाटील यांच्या सह्या आहेत.
Related Stories
December 22, 2024