अमळनेर:- येथील साई इंग्लिश अकॅडमि, अमळनेर या कोचिंग क्लासेस तर्फे प्रत्येक वर्षी निवडण्यात येणारा बहुमानाचा व इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा यंदाचा “साई रत्न” पुरस्कार सोहळा शहरातील
एम.जे.हॉल येथे रविवार,दि.13 मार्च 2022 रोजी पार पडला.
सोहळ्यात हा पुरस्कार सायली नितीन पाटील, नमिता नितीन पाटील, नेहल प्रविण पाटील,हिमांगी राजेंद्र पवार ह्या चार गुणी विद्यार्थिनींना देण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश धर्माधिकारी- सेवा निवृत्त प्राध्यापक, प्रताप महाविद्यालय, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.प्रा.लिलाधर पाटील-इंग्रजी विभागप्रमुख, धनदाई कॉलेज, तसेच पारोळा कोर्टाच्या सरकारी वकील सौ.प्रतिभा मगर, साई इंग्लिश अकॅडमिचे कार्यकारी संचालक-
भैय्यासाहेब मगर,तसेच अनेक विद्यार्थी व पालक तसेच अकॅडमिचे शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत सायली, नमिता, नेहल, हिमांगी यांना यंदाचा “साई रत्न”पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हुशार व होतकरू अश्या चारही विद्यार्थिनी ह्या अगदी सुरुवातीपासूनच साई इंग्लिश अकॅडमिच्या नियमित विद्यार्थिनी आहेत.तसेच अमळनेरातील साने गुरुजी कन्या हायस्कुल व डी.आर.कन्या हायस्कुल च्या विद्यार्थिनी आहेत. पॅनल द्वारा मुलाखत घेऊन ‘साई रत्न’ निवडणारा साई इंग्लिश अकॅडमि हा संपूर्ण महाराष्ट्रातील कदाचित एकमेव क्लास अशी ओळख, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,असे साई इंग्लिश अकॅडमि संचालक भैय्यासाहेब मगर यांनी यावेळी सांगितले.