अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे 20 मार्च रविवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आढावा बैठक संपन्न झाली. त्यात समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून एक मताने रामेश्वर बहारे यांची निवड करण्यात आली. तर भूषण शिंदे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. राहुल सोनवणे (सचिव), चेतन बन्सिलाल बहारे(खजिनदार) प्रशांत बापू सोनवणे (सदस्य) दिपक नाना कढरे (सदस्य), प्रशांत शिंदे(सदस्य), सचिन भगवान सोनवणे( सदस्य), राहुल सुनिल सपकाळे(सदस्य), संजय सुरेश सोनवणे (सदस्य), धर्मपाल प्रकाश सोनवणे(सदस्य), पवन रामलाल सोनवणे (सदस्य), नितीन शरद सोनवणे(सदस्य), दिपक वसंत सोनवणे (सदस्य), अजय शिरसाठ (सदस्य) आदी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.