अमळनेर:- शहरातील राजाराम नगर येथे 10 वर्षांपासून रहिवासी वास्तव्यास आले आहेत व तेथे अनेक सण उत्सव साजरे होतात परंतु कीर्तनाचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला.
येथील रहिवासी डिगंबर नामदेव पाटील यांना नातरत्न व प्रमोद डिगंबर पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल फरकांडे येथील युवा कीर्तनकार ह.भ.प.दिनेशजी पाटील महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम राजाराम नगरमध्ये दि.18 शुक्रवार रोजी रात्री ठीक 9 वाजता पार पडला.
कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी राजाराम नगर मधील सामाजिक कार्यकर्ते रवि संदानशिव,प्रकाश शिंदे, प्रदीप जाधव,एस.एम. पाटील,सुनील बैसाने,रवि चौधरी, निवृत्ती पाटील व निलेश पाटील आदींनी मेहनत घेतली