अमळनेर:- तालुक्यातील नगाव बुद्रुक शिवारात पोलिसांनी १९ रोजी सकाळी सव्वा सात वाजता धाड टाकत चिखली नदी काठावरील झुडुपांमधील गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली आहे. धाडीत ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना माहिती मिळाली की ,नगाव कुऱ्हे रस्त्यावर नगाव बुद्रुक शिवारात राजेंद्र कांतीलाल शिंदे गावठी दारूची हातभट्टी चालवत आहे. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव , नरेश बडगुजर ,वाल्मिक पाटील यांना दारू अड्ड्यावर छापा टाकायला सांगितला. पोलिसांनी गाडी बाजूला करून पायी चालत चिखली नदी काठावर झुडुपांमध्ये गेले असता राजेंद्र कांतीलाल शिंदे हे २००लीटर मापाच्या प्लास्टिक ड्रम मध्ये काठीने दारू ढवळत होता. पोलिसांना पाहताच राजेंद्र पळून गेला. पोलिसांनी चार प्लास्टिक ड्रम मध्ये असलेल्या ८०० लिटर गुळ नवसागर मिश्रित कच्चे रसायन , तसेच ५ हजार रुपये किमतीचे १०० लिटर पक्के रसायन , तर ३५०० रुपयांची ३५ लिटर गावठी दारू असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. नरेश बडगुजर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत. आरोपी राजेंद्र शिंदे फरार आहे.
Related Stories
December 22, 2024