अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्था अमळनेर नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रम शाळा इ ६ वी चा विद्यार्थी चि.आदित्य तानाजी ताकमारे हा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी होऊन सुवर्ण पदक पटकावले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ३५ किलो वयोगटात प्रथम क्रमांकाने यश मिळवून नॅशनल स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
नॅशनल पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असुन त्याला संस्थेचे मुख्याध्यापक प्रदीप शांताराम सोनवणे सोबत शिक्षक आणि शिक्षकेतर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.मुख्याध्यापक प्रदीप शांताराम सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडी बद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
Related Stories
December 22, 2024