
अमळनेर:- तालुक्यात सुंदरपट्टी जि.प.उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी लोकनियुक्त प्रथम सरपंच सुरेश अर्जुन पाटील, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य देविदास पाटील, प्रकाश पाटील, यश देशमुख, किशोर चौधरी, श्रीम.ललीता पाटील, मुख्याध्यापक संजय जगताप, जयश्री बारड, श्रीम.स्मिता सोनवणे यांच्या उपस्थितीत 12 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.







