अनेक इच्छुकांनी सोशल मीडियातून उमेदवारी करण्याची दावेदारी जाहिर…
अमळनेर:- येथील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल नगरसेवक पदाची सोडत काढण्यात आली. त्यात १८ प्रभागांच्या ३६ नगरसेवक सदस्यांपैकी १८ महिला, ३ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. तर इतर सर्व ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण आहे.
अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक 2, 4 व 6 हे प्रभाग राखीव असून त्यात प्रभाग क्रमांक 2 व 6 हे अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जमाती साठी प्रभाग क्रमांक 3 व 18 राखीव असून त्यातील प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती मधील महिलांसाठी राखीव आहे. या आरक्षणावर कोणाला आक्षेप असल्यास दिनांक 15 जून ते 21 जून पर्यंत हरकत घेता येईल. यावेळी अनेक आजी माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.
इच्छुकांची सोशल मीडियातून उमेदवारी जाहीर…
आरक्षण सोडतीनंतर लगेच सोशल मीडियातून पोस्ट टाकत अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी असल्याची जाहीर केले. आपल्या प्रभागात कोणते आरक्षण निघाले याची माहिती देत आपण इच्छुक असल्याचे व्हॉट्सॲप पोस्ट द्वारे जाहीर केले आहे. प्रभाग महिला आरक्षित झाल्याने आपल्या पत्नीची उमेदवारी दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. नगरसेवक पदाची मुदत संपल्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यात प्रभागात अनेक विकासकामे होत असल्याचे सोशल मीडिया द्वारे दाखवत आपण पुढची टर्मही लढणार असल्याचे स्पष्ट केले.
संकटाच्या काळात सर्वसामान्यांकडे अनेकांची पाठ…
कोरोना महामारीच्या काळात काही ठराविकच नगरसेवक स्वतः प्रभागात राहून जनतेची सेवा व कामे करत असल्याचे दिसून आले. बाकी मात्र घरात दरवाजे लावून बसले होते तर काहींनी नागरिक मदत मागतील ह्या भीतीने फोनही बंद करून ठेवले होते. संकटाच्या काळात सर्वसामान्यांकडे पाठ फिरवणाऱ्याना नागरिक ही आता जागा दाखवून देण्याचा तयारीत आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण…
प्रभाग क्रमांक १
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २
अ- अनुसूचित जाती महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
अ – अनुसूचित जमाती महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ – अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९
अ- सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११
अ- सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १७
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८
अ – अनुसूचित जमाती सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण महिला