
अमळनेर:- दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम शिरूड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला. शाळेचे माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्तिमत्व धनराज भगवान पाटील पुणे यांच्या सौजन्याने हा दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व विद्यार्थ्यांना चिवडा व मिठाई शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. धनराज भगवान पाटील यांचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ वाटल्याबद्दल
मनापासून आभार व्यक्त केले व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते

