
पाच जणांना पंधरा लोकांनी केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील सारबेटे येथे मोटारसायकल चालवताना कट मारल्याच्या वादातून एका कुटुंबातील पाच जणांना पंधरा लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना २६ रोजी घडली आहे.

याबाबत सारबेटे येथील नाजिमखान मेवाती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसापूर्वी सारबेटे येथील पेट्रोल पंपाजवळ फैजलखान शफीकखान याने फिर्यादीचे वडील गुलताजखा हनीफखा मेवाती यांना मोटरसायकलचा कट मारल्याने त्यांच्यात वाद झाले होते. त्याचा राग मनात ठेऊन २६ रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सारबेटे बस स्टँडजवळ गुलताजखा मेवाती हे उभे असताना ताहीर अब्दुल रेहमान खान याने त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी अस्लमखा मेवाती, अक्रमखा मेवाती, फरीदखा मेवाती, मशीदखा मेवाती, फैजलखा मेवाती, ताहेर मेवाती, कादरखा मेवाती, सर्फराज मेवाती, समीरखा मेवाती, आजमखा मेवाती, बरिदखा मेवाती, कदामद मेवाती असे जमा झाले. त्यांनी लोखंडी पाने, टॉमी, रॉड आदी साहित्य आणून फिर्यादीला पकडुन ठेवत त्याच्या डोक्यावर व पाठीवर लोखंडी रॉडने मारले यावेळी भांडण आवरायला आलेल्या इम्रानखा जकिरखा मेवाती याला पकडून ठेवत मशीदखा याने डोक्यावर तलवार मारली. त्यानंतर आरिफखा हनीफखा मेवाती हा भांडण सोडवायला आला असता आजमखा याने त्यांच्या हाताला टॉमी मारत हात फ्रॅक्चर केला. तसेच गुलताज खा यांना देखील डोक्यावर रॉड मारून लोखंडी पान्याने मारहाण केली. त्यावेळी सर्फराज खा, वाहिदखा, आजमखा मेवाती हे दगडफेक करून शिवीगाळ करत जिवे मारा म्हणून चिथावणी देत होते. त्यावेळी मुमताजबी गुलामनबी मेवाती, बानूबी सादिकखा मेवाती, फिरोजाबी निजामखा मेवाती यांनी साहेराबी हसीरखा मेवाती यांचे केस धरून शिवीगाळ करत मारहाण करत त्यांचे डोके भिंतीवर आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी गावातील लोकांनी एकत्र येत त्यांची सर्वांची सोडवणूक केली. त्यांना धुळे येथे हिरे मेडिकल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नाजिमखान याने दिलेल्या जबाबानुसार अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एएसआय रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.

