
अमळनेर:- महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील इच्छुकांची ईर्ष्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा अशोक पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपजिल्हाधिकारी एच टी माळी होते.
त्याचप्रमाणे के डी पाटील यांनी एक अर्ज अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले आहे. के डी पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, मनोज पाटील, तुषार संदानशिव यांच्यासह काही कार्यकर्ते हजर होते. यशवंत मालचे, प्रतिभा रवींद्र पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पाठी नाही जनाधार, आणि म्हणे आम्ही उमेदवार…
प्रत्यक्ष ग्राऊंडवर जनतेशी संपर्क नसूनही स्वतःला आमदारकीचा उमेदवार समजणे चुकीचे नाही मात्र आपल्यामागे किती जनाधार आहे याचे आत्मभान असणे ही आवश्यक आहे. काँग्रेसचे के.डी.पाटील व प्रा. अशोक पवार हे दोघे ही स्वतःच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यास इच्छुक होते. मात्र उमेदवारी मिळाली नाही तर दोघांनी आघाडी धर्म पाळणे सोडून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दिलेल्या मुदतीत माघार न घेतल्यास आपल्याला इतकी कमी मते कशी मिळाली याबाबत आत्मपरिक्षण करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. बंडखोर के. डी. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी काँग्रेसचे पदाधिकारी ही उपस्थित होते, त्यावरून काँग्रेसला असलेला फाटाफूटीचा अभिशाप कायम असल्याचे चित्र आहे.

