
अमळनेर:- ट्रॅक्टर का अडवतो असे म्हणत चौघांनी कळमसरे येथील दोघांना मारहाण केल्याची घटना २२ रोजी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी चेतन विजयसिंग राजपूत (वय २९) रा. कळमसरे हा २२ रोजी मोटरसायकलने साहिलखान मेहमूदखान पठाण याच्यासोबत गावी जात असताना रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शहापूर गावाच्या पुढे पडावद फाट्याजवळ रस्त्यावर निलेश प्रतापसिंग परदेशी, कुणाल उदयसिंग परदेशी, (दोघे रा. तांदळी) भूषण विक्रम परदेशी (रा. जैतपीर) व एक अनोळखी इसम अश्या चौघांनी गाडी अडवली. निलेश याने फिर्यादीला ‘तू ट्रॅक्टर का अडवतो ? दादा झाला का ?’ असे विचारत शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ का करतो असे फिर्यादीने विचारल्यावर सोबतच्या लोकांनी त्याला व साहिल याला चापट बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. निलेश याने लोखंडी रॉडने फिर्यादी चेतन व सोहील यांच्या डोक्याला मारले. तसेच आमच्या नादी लागले, तर जिवंत ठेवणार नाही शी धमकी देवून ते निघून गेले. मागून येणारे फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना मेडिकल मेमो घेवून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. उपचार झाल्यानंतर चेतन राजपूत याने दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर हे करीत आहेत.

