अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे.
एका नागरिकाचे अचानक पाय सुजले त्याला उठणे आणि चालणेही कठीण झाले. त्याला उपचारासाठी धुळे येथील हाडांचे डॉ. सैंदाणे यांच्याकडे नेले असता त्यांनी याना चिकुन गुनिया झाला असल्याचे सांगितले. रुग्णाला अमळनेर येथे डॉ निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले असता त्यांनी उपचार केल्याने रुग्ण चालू लागला. डॉ बहुगुणे यांनी लक्षणे चिकुन गुनिया सारखे असल्याचे सांगितले.
डासांमुळे चिकुन गुनिया पसरत असतो म्हणून नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. हा आजार पसरू नये म्हणून पालिका व ग्रामपंचायतींकडून डासांची फवारणी केली पाहिजे अशीही मागणी होत आहे.