अमळनेर : येथील राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादु धोबी याचा एमपीडीए आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे.
फेब्रुवारी महिन्यात दादू निकुंभ याच्यावर एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर कारागृहात रवाना करण्यात आले होते. याबाबत त्याने ऍड राहील रियाजोद्दीन काझी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ऍड काझी यांनी युक्तिवाद करताना अधिकाऱ्यांनी एमपीडीए च्या अनिवार्य प्रक्रियांचे पालन केले नाही, अटक करण्याचे पुरेसे कारण सांगितले नाही, आदेशाची पावती वेळेवर दिली नाही, योग्य कागदपत्रे सादर केलेली नाहीत. आरोपी हा कारागृहात होता, गोपनीय जबाबात त्याचे नवीन गुन्हे नाही तर पूर्वीचा इतिहास सांगितला होता, मागील गुन्ह्यांचा सद्यस्थितीशी संबंध जुळत नव्हता,संविधानातील कलम २२ अंतर्गत ग्वाही दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे सांगितले. ऍड काझी यांच्या युक्तीवादावर न्या वि भा कांकणावाडी आणि न्या एस जी चपळगावकर यांनी दादू धोबी याचा एमपीडीए आदेश रद्द केला आहे.