
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर मारवड पोलिसांनी पकडले आहे.
बोहरा शिवारात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने एपीआय जयेश खलाने, पीएसआय वैभव पेठकर, हे. कॉ. सुनील अगोने व पो. कॉ. अनिल राठोड यांचे पथक बोहरा शिवारात डांगरी ते बोहरा कच्च्या रस्त्याच्या अलीकडे थांबले असता त्यांना ट्रॅक्टर येताना दिसल्याने त्यांनी ते थांबवले. निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर एम् एच १९ डी व्ही २२५० या ट्रॅक्टर मध्ये वाळू असल्याचे दिसून आल्याने चालकास नाव विचारल्याने त्याने गोलू उर्फ चंद्रभान गोकुळ कोळी रा. पाडळसरे येथील असल्याचे सांगून बोरी नदी पात्रातून ही अवैध रित्या वाळू भरल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले असून मारवड पोलीसात कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. ना. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.







