
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील ३३ वर्षीय शेतकऱ्याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना दि. २८ रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील जितेंद्र संजय माळी (वय ३३) हे दिनांक २८ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात मका काढणीचे काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना गावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना ऊन लागले असून प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णांस अमळनेर येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. रस्त्यातच त्यांचा जीव घाबरु लागल्याने ते बेशुद्ध झाले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यावरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो. राजेंद्र पाटील हे करीत आहेत.







