
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत अहिराणी पर्वात गोट-गोटाड्या ह्या कथाकथन स्पर्धेत अहिराणी कथा सादर केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेसह,सन्मानपत्र वाटप करण्यात आले.
एकूण 12 विजेत्यांना गटानुसार व मिळालेल्या क्रमांकानुसार मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून कोकण प्रदेश विभागीय अहिराणी संवर्धन परिषदेचे मगन सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त प्राचार्य मगन सूर्यवंशी यांनी “चालव धनिन चाल तू लवलव आते चाल” ही स्वयंरचित अहिराणी रचना सादर केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव मोरे, शाळा समितीचे अध्यक्ष नितीन बिरारी, संदीप कोळी, घनश्याम पाटील,भूषण बिरारी, मुख्याध्यापक कैलास माळी, शिक्षक राजेंद्र बागुल सह सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित पवार यांनी केले.







