सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- सावखेडा येथील जि.प.केंद्र शाळेत नुकतेच अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे “स्टार्स” प्रकल्पांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून आयोजित इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी, शाळापूर्व तयारी केंद्र स्तरीय प्रशिक्षण जि.प केंद्र शाळा सावखेडा येथे भानुदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून, पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आले.
स्टार्स प्रशिक्षणचे सुलभक जिजाबराव पाटील, जगदीश चौधरी मुंगसेकर हे होते. त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना आकार प्रशिक्षणा बाबत मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प केंद्र शाळेचे मुख्याध्यापक बाळू पाटील, आरोग्य सेविका एस. बी. गीते, शिक्षिका बोरसे,तायडे व केंद्रातील सर्व अंगणवाडी सेविका व सर्व मदतनीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बाळु पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार शिक्षक वृंदानी केले.