अमळनेर :- लहान मुलांना पोटातील जंतापासून इतर आजारांची लागण होवू नये.व बालकांचे या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात.त्यात राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील ० ते १९ वयोगटातील सुमारे ७३ हजार १३१ लहान बालकांना आरोग्य विभागामार्फत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यात जंत नाशक दिन तालुक्यातील पाच आरोग्य केंद्र व सर्व उप केंद्र,तसेच शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र व पालिका रुग्णालय तसेच अंगणवाडी,जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा तसेच विना अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या ० ते १९ वयोगटातील ७८ हजार ८९३ बालकांना मोफत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात यावे असे उद्धिष्ट देण्यात आले होते त्यापैकी आरोग्य विभागाने ७३ हजार १३१ बालकांना जंत नाशक गोळ्यांचे वाटप केले तर उर्वरित ७ हजार ७६२ बालकांना दुसरया टप्प्यात गोळ्या वाटप होणार आहेत.राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेचा उद्देश ० ते १९ वयोगटातील सर्व मुलामुलींना अंगणवाडी व शाळा या ठिकाणी जावून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे.तसेच पोषणस्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.त्यासाठी मंगळवारी तालुक्यातील ० ते १९ वयोगटातील बालकांना मोफत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
प्रतिक्रिया…
तालुक्यातील एकही बालक जंत नाशक गोळी पासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजन करून मोहीम राबविण्यात आली.तसेच त्यादिवशी आजारी व इतर उर्वरित बालकांना नंतर गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल.
डॉ. गिरीश गोसावी ,तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती अमळनेर