त्रयोदशीला काल्याच्या कीर्तनाच्या महाप्रसाद वाटून होईल सांगता
अमळनेर:- तालुक्यातील श्रीक्षेत्र पाडळसरे गावी ग्रामरक्षक पवनसूत हनुमंतरायाच्या कृपेनें संत तुकाराम महाराज भजनी मंडळ आणि ग्रामस्थांकडून सालाबादा प्रमाणे या वर्षी ही गीता जयंती निमित्ताने मार्गशीर्ष नागपंचमीला म्हणजेच गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होईल तर मार्गशीर्ष त्रयोदशी दिनांक 12 डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. कीर्तन सप्ताहास परिसरातील या हरिनाम कीर्तन सप्ताहात भाविकांची मोठी उपस्थिती असते.
गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी १२ नंतर हनुमान मंदिरात मंत्रोच्चार व विधीवत पुजन अभिषेक करून विठ्ठल- रुक्मिणी मुर्ती स्थापित करून संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या प्रतिमासह श्रीराम सीता माता मूर्ती पूजन करून हरिनाम सप्ताहाची मांडनी होईल , यात दैनिक कार्यक्रम खालील प्रमाणे दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ ,भारुड व रात्री 8 ते 10 या वेळेत जाहिर हरीकीर्तनाचा कार्यक्रम होणार असून किर्तना साठी वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील नामवंत कीर्तनकार हजेरी लावून किर्तनरुपी सेवा देणार आहेत त्यात दिनांक 5 रोजी गुरुवारी हभप राहुल महाराज-दोनगावकर , दिनांक 6 शुक्रवारी हभप दिनेश महाराज -निमकर , दिनांक 7 शनिवारी हभप आकाश महाराज-पाडळसरेकर, दिनांक 8 रविवारी हभप भोला महाराज -जळगावकर , दिनांक 9 सोमवारी हभप मछिंद्र महाराज-वाडीभोकरकर दिनांक 10 मंगळवारी हभप अंकुश महाराज-मनवेलकर, दिनांक 11 बुधवारी गीताजयंती निमित्त दुपारी ४ ते ६ गीताग्रंथाची पालखी सोहळ्याची मिरवणूक होऊन विठ्ठल रुक्मिणी मुर्त्यांची व गीता भागवत ग्रथांची गावभर मिरवणूक काढण्यात येईल व रात्री हभप शशिकांत महाराज यांचे कीर्तन होऊन गुरुवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी त्रयोदशी निमित्त सकाळी ९ ते ११ या वेळास हभप शशिकांत महाराज-भवरखेडेकर यांचे काल्याचे जाहिर हरीकीर्तन होऊन १२ ते २ या वेळात महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व महर्षी वाल्मिकी मित्र मंडळ , शिवसरदार ग्रुपसह एकलव्य मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी केली आहे