अमळनेर:- येथे श्रीमती.डि.आर. कन्याशाळेत महापरिनिर्वाण दिना निमित्ताने शाळेतील दोनशेच्या वर विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र काढले.
शाळेतील कला शिक्षक डि. एन.पालवे यांनी इयत्ता आठविच्या विद्यार्थिनींना पंधरा दिवस व्यक्तिचित्र काढणे शिकविले. यासाठी शाळेचे शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल यांनी प्रेरणा दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, पर्यवेक्षक श्रीमती एस.पी.बाविस्कर, एस.एस.माळी यांनी मार्गदर्शन केले.शाळेत सकाळ व दुपार दोन्ही विभागात विद्यार्थिनींनी भाषणे दिली.