अमळनेर : तुषार चौधरी याच्या खून प्रकरणातील आरोपी प्रेमी युगुलाला ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुषार याचा मंगरूळ एमआयडीसीत दगडाने मारून खून करण्यात आला होता. मालपूर दोंडाईचा येथील सागर बापू चौधरी याचे तुषार याच्या पत्नी पुजाशी प्रेम संबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे असल्याने सागर ने अडथळा बाजूला केला. पोलिसांनी सागर व पूजा या प्रेमी युगुलाला अटक केली होती. त्यांना पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी न्यायालयात हजर केले असता न्या एलमाणे यांनी ११ पर्यंत कोठडी सुनावली आहे.