अमळनेर: 1 ते 15 डिसेंबर या दरम्यान जागतिक एड्स पंधरवाडा निमित्ताने अमळनेर ग्रामीण रुग्णालय, आय.सी.टी.सी.विभाग,ए. आर.टी.विभाग, रोटरी क्लब व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने, अमळनेर शहरात अठरा वर्षाच्या वर सर्वासाठी खुल्या रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.त्यावेळी दोन्ही स्पर्धेत पन्नासच्या वर स्पर्धक सहभागी होते.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून करुणा क्लबचे जिल्हा सचिव डी. एन .पालवे हे होते.प्रमुख पाहुणे डॉ.जी.एम.पाटील, डॉ.पी.के.ताडे, डॉ.प्रशांत शिंदे,डॉ. शरद बाविस्कर,डॉ. सुमित पाटील, डॉ.राजेंद्र ठाकरे,रोटरी क्लबचे प्रतीक जैन,देवेंद्र कोठारी,उदय कुमार खैरनार, किशोर सूर्यवंशी, अमोल शाह,संजय मुसळे, शरद शेवाळे, समाजकार्य महाविद्यालय डॉ.अनिता खेडकर, प्रा. विजयकुमार वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग लाभला. जनजागृती मोहिमेअंतर्गत स्पर्धेचे आयोजन ग्रामीण रुग्णालय येथील समुपदेशक अश्वमेध पाटील, दीपक शेलार, जयेश मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे, छाया सरपे, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष डॉ.भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणु प्रसाद ,राकेश महाजन, अश्विनी सूर्यवंशी, कल्पना सूर्यवंशी, मुरलीधर बिरारी व संस्थे अंतर्गत असणाऱ्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले. सर्व स्पर्धकांना रोटरी क्लब अमळनेर तर्फे बक्षीस देण्यात आले तर सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली.
रांगोळी स्पर्धेतील विजेते…
प्रथम क्रमांक प्रियंका परदेशी,द्वितीय क्रमांक मयुरी बारी,तृतीय क्रमांक स्नेहल पाटील,उत्तेजनार्थ प्रेरणा लिंगायत
पोस्टर स्पर्धेतील विजेते…
प्रथम क्रमांक ज्योती भोई,
द्वितीय क्रमांक सोनू तेजी,
तृतीय क्रमांक आशा जाधव