अमळनेर:- 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 8 डिसेंबर रोजी चाळीसगांव येथे झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
12 ते 16 वयोगटात पल्लवी सुरेश पाटील हिने 100 मिटर धावणे यात प्रथम,स्पॉट जम्प- द्वितीय, प्रेम धनराज माळी हिने गोळाफेक मध्ये द्वितीय, नेत्रा धनराज पवार हिने स्पॉट जम्प मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग व माधुरी भागवत यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून विद्यार्थांना गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मंगेश वैद्य,सचिव डॉ.वैशाली वैद्य,सदस्य डॉ. मिलिंद वैद्य,गिरिश कुलकर्णी यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक विनोद पाटील,वैशाली राऊळ,सोनाली पवार, हेरंब कुलकर्णी,नामदेव जाधव इ. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेतले.