गावकरी व विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाहमुक्त भारत शपथ…
अमळनेर – तालुक्यातील मंगरूळ येथील स्व.आबासाहेब अंबर पाटील माध्यमिक विद्यालय येथे “एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन” ‘आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर ” द्वारा बालविवाह मुक्त भारत ची शपथ सरपंच समाधान पारधी यांनी दिली.
गावातून बालविवाह विरोधात घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. तसेच समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी, अन्वर, कीर्ती, अनुजा, रत्ना, मयुरी या विद्यार्थ्यांनी ‛बालविवाह थांबवा’ पथनाट्य च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी विद्यालयाचे प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील ,संजय पाटील, राजेंद्र पाटील, राहुल पाटील, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, शीतल चव्हाण तसेच आधार संस्थेचे रेणू प्रसाद, डॉ भारती पाटील, आनंद पगारे, मोहिनी धनगर,दीप्ती गायकवाड, तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.