पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची झाली सुरुवात…
अमळनेर:- पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेसाठी शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर, जामनेर, नंदुरबार, शहादा, मोताळा या समृद्ध गाव स्पर्धेतील 5 तालुक्यातील सहभागी सदस्यांच्या प्रशिक्षणाची जळगाव येथील आर्यन रिसॉर्ट सेंटर येथे सुरुवात झाली. अमळनेर तालुक्यातील शेतकरी बंधू पासून प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. पाणी फाउंडेशन चा वॉटर कप स्पर्धेमध्ये उत्तर महाराष्ट्राचा 2018 पासून सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्रातील गावांनी या स्पर्धेत दुष्काळ निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणात 18 व 19 साली सहभाग घेतला. शेकडो गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशन च्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो गावे पाणीदार बनवले व दुष्काळ मुक्तीकडे पाऊल टाकले. याच धर्तीवर गावकऱ्यांच्या व जलमित्रांच्या एकीतून निर्माण केलेल्या पाण्याचे आर्थिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी 2020 साली समृद्ध गाव स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये जल व मृदा संधारण कामे करणे,पीक नियोजन, जल व्यवस्थापन, संरक्षित करून क्षेत्र निर्माण करणे, वृक्ष व जंगलाची वाढ करणे,शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करणे या घटकांवरती सत्यमेव जयते समृद्धगाव स्पर्धेचे काम 2020, 21 या साली टप्पा 1 व टप्पा 2 मध्ये पाच घटकांवरती केले. या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 900 गावांपैकी 700 गावांनी कोरोनाच्या महामारी मध्येसुद्धा उत्कृष्ट काम केले. या कालावधीमध्ये कोरोना या वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व लोकांना एकत्रित होण्याची संधी मिळत असताना पाणी फाऊंडेशन पुन्हा एकदा मिशन बिगीन अगेन करिता पिणी फाऊंडेशनच्या वाॅटरकप स्पर्धेमध्ये गावकऱ्यांनी निर्माण केलेल्या पाण्याचे आर्थिक समृद्धी रूपांतर करण्याकरिता सत्यमेव जयते समृद्धी फार्मर कप स्पर्धा घेण्याचे नियोजन केले. शेकडो गावांमध्ये सभा ऑनलाईन मीटिंग व गावकरी यांच्या भेटी घेवून फार्मर कप माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावकर यांनी निर्माण केलेल्या पाण्याचे आर्थिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल करण्यासाठी समृद्धी प्रशिक्षणाची सुरुवात केली. प्रशिक्षणाची सुरुवात अमळनेर तालुक्यातील समृद्धगाव स्पर्धेतील गावातिल पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षनार्थी शेतकरी बांधवांना जळगाव येथील आर्यन इको रिसॉर्ट या ठिकाणी प्रशिक्षणाची सुरुवात झाली. या प्रशिक्षणामध्ये समृद्धगाव स्पर्धेतिल शेतकरी बंधू-भगिनींना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवन्यासाठी, शेतकरी पिकांचे गट निर्मीती, गट शेतीच्या माध्यमातून एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीने सोडवू शकतो या संदर्भात ज्ञान देणे तसेच गावांमध्ये गटांची निर्मिती करून एफपीओकडे कशी वाटचाल करायची,तसेच एफपिसीची कशी निर्मीती करायची,पिकांची पूर्वमशागतिपासून ते काढणी पर्यतचे ज्ञान व त्या स्टॅटर्ड ऑपरेटिंग पद्धती कशा पद्धतिने करायच्या या सर्व पद्धतिचे ज्ञान पिणी फाऊंडेशनचे मास्टर ट्रेनर, तांत्रिक प्रशिक्षक, सामाजिक प्रशिक्षक देतात. तसेच हे ज्ञान फिल्म, खेळ , चर्चा सञाचे माध्यमातून दिले जाते. हे प्रशिक्षण तीन दिवसा टप्प्याटप्प्याने दिले जाते तसेच हे प्रशिक्षण घेतल्यानंतर देखील शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या पिकांच्या बनवलेल्या गट यांना पूर्व मशागतीपासून ते पीक काढून विक्री करेपर्यत च्या सर्व पद्धतिचे तांत्रिक ज्ञान कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ व तज्ञ व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या कार्यशाळा यांच्या माध्यमात दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये काम करणाऱ्या गटांना समृद्ध गाव स्पर्धेच्या मूल्यांकनाच्या आधारित काम केले तर राज्यस्तरावर प्रथम २५ लक्ष द्वितीय १५ लक्ष व तृतीय बक्षीस १० लक्ष व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गटाला १ लक्ष असे बक्षीस पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दिले जाणार आहे.