आमदार अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…
अमळनेर :- तालुक्यातील शिरुड येथील प्रगतिशील आदर्श शेतकरी भालेराव उत्तम पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रा.डॉ सुनील भालेराव पाटील, विभाग प्रमुख सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ वसंतराव नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शहादा यांनी लिहलेल्या ‘माझ गाव माझा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन गुढीपाडवाच्या दिनी शिरूड ग्रामपंचायतीच्या आवारात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो आपली जन्मभूमी असलेल्या गावासाठी काहीतरी वेगळे करावे, नोकरी निमित्त बाहेरगावी राहिल्याने गावची माहिती लिहिण्याचे धाडस त्यांनी केले. आहे गावाचे नाव लौकिक व्हावे, महान कार्याचा विसर पडू नये तसेच नवीन पिढीला त्याच्या कार्याची माहिती व्हावी. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा संदर्भ लक्षात घेण्यासाठी गावाचा इतिहास काय? काळाच्या पडद्याआड गेलेले घटना मांडून आपलाच गौरवशाली इतिहास ‘माझं गाव माझा इतिहास’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न प्रा. डॉ. सुनिल पाटील यांनी केला आहे. आमदार अनिल पाटील व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करत मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी पं.स माजी सभापती शाम अहिरे, प्राचार्य डॉ वसंत देसले, प्राचार्य डॉ.विलास सोनवणे, कृ.उ.बा. मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, किसान कॉग्रेस ता.अध्यक्ष प्रा.सुभाष पाटील, सरपंच गोविंदा सोनवणे, उपसरपंच कल्याणी पाटील, पो.पा विश्वास महाजन, पोपट बारकू, प्रफुल्ल पाटील, योजना पाटील यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिकांच्या उपस्थितीत ‘माझं गाव माझा इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला. साने गुरुजी प्रसारण मंडळ अमळनेर येथील शिक्षक डी. ए. धनगर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रा. डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले.