महिलेची पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या मंडळींविरूद्ध मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळगाव येथील माहेर असलेल्या विजया यांच्या विवाह एरंडोल येथील विजय भाऊलाल गव्हाणे यांच्याशी झाला होता. विवाहाच्या काही कालावधीनंतर सासरे भाऊलाल गव्हाणे, सासू वच्छला गव्हाणे, नणंद उषा निकम, नणंद सुनिता बैसाने हे सदर विवाहितेच्या पतीला भडकावून देत असल्याने तो विवाहितेला मारहाण व शिवीगाळ करत असे. त्यानतंर त्याने वागण्यास नकार दिल्याने दिनांक १९ मे १८ रोजी माहेरी सोडण्यास आले असता पतीने विवाहितेच्या आईवडिलांना शिवागाळ केली व तिला ही मारहाण केली. त्यानतंर सदर विवाहिता महिला समुपदेशन केंद्र व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो निरर्थक ठरल्याने मारवड पोलिसांत वरील सर्वांविरुद्ध तक्रार देण्यात आली असून भादवि कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. संजय पाटील हे करीत आहेत