–
अमळनेर– जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), जिल्हा परिषद शिक्षण विभाग जळगाव व पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 रोजी अमळनेर तालुक्यातील शहापूर केंद्र अंतर्गत सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांनी उल्लास नवभारत साक्षरता मेळावा हा अमळनेर तालुक्याला मिळालेल्या विषय व थीम नुसार शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, केंद्रप्रमुख अशोक चुडामन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. सहभागी सर्व शाळांमधून जि.प. शाळा तांदळी शाळेचे कुटुंब, वंशावळ,भारतीय साक्षरता,लोकसंख्येचे प्रमाण, शेजार, नातेसंबंध याविषयी सुस्पष्ट रचना केली होती व शहापूर शाळेचे कुटुंबातील व्यक्तींचा व्यवसाय व स्त्री-पुरुष प्रमाण या शैक्षणिक साहित्याची निवड जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी करण्यात आली होती. यात तालुका पातळीवर जि.प.प्राथमिक शाळा तांदळी ने प्रथम व जि.प. केंद्र शाळा शहापूर ने द्वितीय क्रमांक पटकावला होता. यात तांदळी शाळेतून युवा प्रशिक्षणार्थी उपशिक्षक चि.कृणाल भरत पाटील व शहापूर शाळेचे युवा प्रशिक्षणार्थी उपशिक्षक चि.सचिन कैलास पाटील हे जिल्हास्तरीय उल्लास नवभारत साक्षरता मेळावा कार्यक्रम दि. 17 रोजी नवोदय विद्यालय साकेगाव भुसावल येथे सहभागी झाले. यात त्यांना शहापूर शाळेचे मुख्याध्यापक संजय भगवान पाटील व तांदळी शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव साहेबराव बोरसे व तसेच दोन्ही शाळेतील उपशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. अमळनेर तालुक्यातील सहभागी शाळांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जि.प. जळगाव श्री अंकित जी यांनी सदरील शाळांना प्रशस्तीपत्र देऊन सर्व सहभागी शाळांचे अभिनंदन केले.