1 कोटीच्या वर ढोबळ नफा तर प्रथमच 80 लाख रु निव्वळ नफा …
अमळनेर:- तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या दि अमळनेर को-ऑप.अर्बन बँकेने 2021-22 या आर्थिक वर्षात ढोबळ नफा रू.1 कोटी 10 लाख व बँकेच्या इतिहासात प्रथमच रू 80.41 लाखाचा निव्वळ नफा मिळवून नेत्रदिपक कामगिरी केली असल्याची माहिती विद्यमान चेअरमन अभिषेक विनोद पाटील यांनी दिली.
सन 2016 पासून निवडून आलेल्या संचालक मंडळाने अनेक धाडसी निर्णय घेऊन व थकबाकी वसूलीबाबत कठोर निर्णय घेउन सदरची नेत्रदिपक कामगिरी करतांना कर्जदरात कपात, रिबेटमध्ये वाढ, खर्च कपात ई. माध्यमांचा वापर करत हे यश प्राप्त करून सर्व संचालकांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.खालील आकडेवारीवरून बँकेची सक्षम स्थिती निदर्शनास येते.2021 साली बँकेच्या ठेवी 5812.51 असताना 2022 साली 5866.26 लाख झाल्या आहेत, तर भागभांडवल 287.15 असताना 297.61 लाख झाले आहे,राखीव व इतर निधी 591 38 लाख असताना 633.49 लाख झाला आहे,गुंतवणूक 2717.88 लाख असताना 2626.59 लाख झाली आहे. कर्जवाटप 3544.71 लाख असताना यंदा कर्जवाटप 3691.50 लाख झाले आहे,व मागील वर्षी नफा 40.61 लाख असताना यंदा 80.41 टक्के नफा झाला आहे.
सद्यस्थितीत बँकेचा एकूण व्यवसाय रू. 95.58 कोटी इतका असुन बँकेच्या शतक महोत्सवपूर्वीच तो रू.100 कोटीवर नेण्याचा संकल्प संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. बँकेची थकबाकी, ग्रॉस एनपीए, नेट एनपीए, गुंतवणूकी, भांडवल पर्याप्तता या सर्व बाबी रिझर्व बँकेच्या निर्देशीत प्रमाणात आहेत ही बँकेसाठी विशेष उल्लेखनिय बाब आहे अशी माहिती चेअरमन अभिषेक पाटील यांनी दिली आहे.तसेच बँकेच्या या नेत्रदिपक कामगिरीमध्ये विद्यमान उपाध्यक्ष प्रविण श्रीराम पाटील , संचालक भरत सुरेश ललवाणी, पंकज गोविंद मुंदडे, प्रविण रामलाल जैन, प्रदीप कुंदनलाल अग्रवाल, दिपक छबुलाल साळी, लालचंद हेमनदास सैनानी, पंडित रामचंद्र चौधरी,मोहन बाळाजी सातपुते, वसुंधरा दशरथ लांडगे, मिराबाई रमेश निकम, श्री.गणेश बाबुराव बाविस्कर- तज्ञ संचालक, ॲड रमाकांत सुदाम माळी यांचेसह बँकेचे मुख्य कार्य, अधिकारी अमृत आर.पाटील, व संपूर्ण स्टाफ यांची मोलाची भूमिका असुन त्याचबरोबर बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याची भावना चेअरमन अभिषेक पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान भविष्यात कर्जदारांसाठी व्याजदरात कपात, ऑनलाईन व्यवहार सुविधा याच बरोबर नियमित लाभांश वाटप ई. सुविधा करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचे अनमोल सहकार्य, व बँकेवरील आपला विश्वास आणि जिव्हाळा असाच कायम ठेवावा अशी अपेक्षा अभिषेक पाटील यांनी व्यक्त केली आहे.