
अमळनेर:- अमळनेर शहरात संत गाडगे बाबा यांची १४८वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात सकाळी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, कदम, मुकादम श्याम करंदीकर, पुनमचंद संदानशिव तसेच सफाई कर्मचारी यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले. दुपार सत्रात ह.भ.प. प.पू. प्रसाद महाराज यांच्याहस्ते गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून मुख्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी युवा परीट मंडळ व परदेशी धोबी समाज कार्यकारिणी, सल्लागार व समाज बांधव उपस्थित होते. मिरवणुकीच्या मार्गावर, गाडगेबाबा चौकात व संत गाडगेबाबा उद्यानात सुशोभित वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या .
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष, भजने, माऊली भजनी मंडळ व पारंपारिक वाद्यचा तालावर मिरवणूक वाडी चौक- पानखिडकी- सराफ बाजार -दगडी दरवाजा- गाडगेबाबा चौक मार्गे मिरवणूक गाडगेबाबा उद्यानात समारोप करण्यात आला. राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात मदत पुनर्वसन व आपत्ती कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व आरती करण्यात आली. मिरवणुकीच्या समारोपावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा उद्यानात मराठी साहित्य संमेलनाचे गीत लिखाण करणारे समाज बांधव डॉ. रमेश माने यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीच्या समारोप करण्यात आला. गाडगेबाबा चौकात राकेश परदेशी, विजय लॉन्ड्री, युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाजाच्या वतीने महाप्रसाद व शरबत वाटप कार्यक्रम करण्यात आला. सदर जयंती व मिरवणुक कार्यक्रमास युवा परीट मंडळ व परदेशी धोबी समाज बंधु व भगिनी मोठ्या व विक्रमी संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोघे कार्यकारिणीतील सदस्य व सल्लागार व समाज बांधवांनी प्रयत्न केले.